मुंबई : घाटकोपर मध्ये राहणारे जवान मुरली श्रीराम नाईक यांना पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात वीरमरण

 मुंबई : घाटकोपर मध्ये राहणारे जवान मुरली श्रीराम नाईक यांना पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात वीरमरण
  • MG News
  • मे 10 2025

Share on  

 मुंबई : घाटकोपर मध्ये राहणारे जवान मुरली श्रीराम नाईक यांना पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात वीरमरण 

     घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर मध्ये राहणारे जवान मुरली श्रीराम नाईक हे उरी येथे पाकिस्तान ने केलेल्या हल्ल्यात शहीद झाले आहेत. मूळचे आंध्रप्रदेश चे राहणारे. नाईक कुटुंब अनेक वर्ष कामराज नगर मध्ये राहत होते. मुरली यांचे आईवडील हे मोलमजुरी करून मुरलीचे शिक्षण पूर्ण केले होते. एकुलता एक असलेल्या मुरली ने सैन्यात जाऊ नये असे मुरलीच्या आई वडिलांचे मत होते. मात्र देशसेवेसाठी मुरली सैन्यात भरती होण्यावर ठाम होता. २०२२ साली त्याचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. उरी येथे कर्तव्यावर असताना त्याला वीरमरण आले. आठवड्यापूर्वी मुरली यांचे आईवडील त्यांच्या आंध्र येथील कल्की तांडा गावी गेले. आणि त्यांना ही बातमी कळाली. तसेच सकाळी ही बातमी कामराज नगर मधील नागरिकांना कळताच इथे शोककळा पसरली. त्याचे मित्र आणि शेजाऱ्यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. 

संबंधित बातम्या