महायुती सरकारमध्ये वाद सुरु आहे, बहिणींना 1500 द्यायला यांच्याकडे पैसे नाही - आनंद दुबे

 महायुती सरकारमध्ये वाद सुरु आहे, बहिणींना 1500 द्यायला यांच्याकडे पैसे नाही - आनंद दुबे
  • MG News
  • मे 5 2025

Share on  

मुंबई : महायुती सरकारमध्ये वाद सुरु आहे, बहिणींना 1500 द्यायला यांच्याकडे पैसे नाही - आनंद दुबे 

महायुती - ज्या दिवसापासून हे सरकार अस्तित्वात आले त्या दिवसापासून सरकारमध्ये वाद आहे - यांचे वादे, जुमलेबाजी काहीच पूर्ण होत नाही - पहिले सांगितले होते की, लाडक्या बहिणींना 1500 च्या जागी 2100 देऊ. पण आता 1500 पण द्यायला तयार नाही आहेत आणि आता परिस्थिती अशी आहे की, आता बहिणींना 1500 द्यायला यांच्याकडे पैसे नाही - सामाजिक न्यायाचे पैसे आहेत, आदिवासी विभागाचे पैसे आहेत ते वापरत आहेत - जे सामाजिक न्यायाचे मंत्री आहेत ते रडत आहेत की, आमचे पैसे कुठे घेऊन जात आहेत - पैसे नसेल तर तसं सांगा पत्रकार परिषदेत समोर या आणि सर्व गोष्टींचा खुलासा करा की आमच्याकडे पैसे नाही आहेत - मग जनतेला पण कळेल की, हे कोण लोकं होते. कसा यांनी आमचा छळ केला - सरकारमध्ये जे मंत्री बसलेत यांचे आपापसात किती वाद आहेत - संजय शिरसाट आणि अजित पवार गट कसे समोरासमोर उभे आहेत, एक दुसऱ्यांची विचारधारा मानत नाहीत - अजित पवारांनी एक कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे नाही पोहोचले. तिथे प्रताप सरनाईकांना पाठवलं - या लेव्हलवर या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, हे दुर्दैव आहे - या सरकारमध्ये काही चांगलं सुरू नाही - आम्हाला दुःख आहे की, आमची बहीण आज पंधराशे रुपयांसाठी रडत आहे. पण हे सरकार त्यांचं ऐकत नाही. हे दुर्भाग्य आहे

 आनंद दुबे, शिवसेना ठाकरे गट प्रवक्ते

संबंधित बातम्या