MUMBAI | सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची कालची गटारगंगा बघायला मिळाली - हर्षवर्धन सपकाळ

MUMBAI | सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची कालची गटारगंगा बघायला मिळाली - हर्षवर्धन सपकाळ
  • MG News
  • मे 27 2025

Share on  

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची कालची गटारगंगा बघायला मिळाली - हर्षवर्धन सपकाळ

 मोठ्या कार्यकाळापासून एकनाथ शिंदे हे नगर विकास विभागाचे मंत्री राहिलेले आहेत.
 मुख्यमंत्री देखील मुंबईच्या प्रशासनामध्ये सातत्याने ढवळाढवळ करत असतात. या सर्वांनी मिळून जो गोंधळ घातलेला आहे, जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याचा परिणाम म्हणून काल मुंबई तुंबली होती व जी गटारगंगा काल बघायला मिळाली ही सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा होती असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
 भूमिगत मेट्रो जी आहे हा देवेंद्र फडणवीसांचा राजहट्ट आहे.
 त्याचा प्रयोग करून बघितला यात कोणतीही हरकत नाही. मात्र, सुरक्षेच्या ज्या सर्व उपाय योजना होत्या त्या केल्या नव्हत्या
 उद्घाटनाची जी घाई केली त्याचा परिणाम काल दिसला असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

संबंधित बातम्या