कर वसुलीसाठी मनपाची अनोखी शक्कल; कर बाकी धारकांच्या घरासमोर वाजवले ढोल ताशे

कर वसुलीसाठी मनपाची अनोखी शक्कल; कर बाकी धारकांच्या घरासमोर वाजवले ढोल ताशे
  • MG News
  • फेब्रुवारी 22 2025

Share on  

 धुळे शहरातील मालमत्ता कर धारकांकडे तब्बल 100 कोटी रुपयांची कर थकबाकी असल्याने आता धुळे मनपा प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कर बाकी धारकांकडे वारंवार पाठपुरावा करून नोटिसा देऊन देखील कर धारक मनपा प्रशासनाला कुठल्याही प्रकारची दाद देत नसल्यामुळे आज अखेर नाईलाजास्तव मनपा कर विभागाने कर धारकांच्या घरासमोर जाऊन ढोल ताशे वाजवून कर वसुलीचा मार्ग अवलंबला आहे.

धुळे शहरातील नेहरूनगर परिसरामध्ये असलेल्या तर बाकी धारकाकडे गेल्या दहा वर्षापासून तब्बल दोन लाखाहून अधिक बाकी असल्यामुळे मला प्रशासनाने त्यांना वारंवार नोटीस देऊन देखील या कर्दार्काने मनपाला कुठल्याही प्रकारचा कर भरला नसल्यामुळे आज अखेर आयुक्तांच्या आदेशाने या कर धारकाच्या घराबाहेर मनपा प्रशासनाच्या कर विभागाने ढोल ताशा पथकांसह येऊन ढोल ताशा वाजवून त्याच्या असलेल्या दुकान सील केले आहे. त्यामुळे आता धुळे शहरातील कर धारकांनी आपल्यावर अशी कारवाई होऊ नये त्यामुळे लवकरात लवकर धुळे मनपा प्रशासनाच्या कर विभागामध्ये जाऊन आपली बाकी भरावी असे आवाहन मनावर प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
 

संबंधित बातम्या