नागपूर : राजकारणात बालिशपणा सुरू आहे. खेळ खंडोबा सुरू आहे. : विजय वडेट्टीवार
राजपुरोहित हा अडगळीत पडलेला माणूस आहे. मेन स्ट्रीम मध्ये येण्यासाठी पुरोहित यांचे प्रयत्न सुरू आहे. पुन्हा एकदा अध्याय लिहा. हा बालिशपणा सुरू आहे. खेळ खंडोबा सुरू आहे. राजकारणात धर्म आणायचं. कोण देव आहे कोण दानव आहे हे जनता ठरवेल.
कोणी सरकारला निकम म्हणते. कोणी भिकारी म्हणते. सरकारला टीका करत आहेत. देश कोणता पातळीवर आहे या संदर्भातील खरं वास्तविकता आता समोर येत आहे. जर सरकारची सच्चाई गडकरी साहेब लोकांसमोर पुढे आणत आहे तर त्यांना धन्यवाद म्हटलं पाहिजे. गडकरी नेहमी सच्चाई ची गोष्ट करतात ते केंद्र सरकार संदर्भात असो किंवा मग राज्य सरकार संदर्भात असो. सरकारची खरी परिस्थिती अशी लोक जर सामोर आणत असतील तर त्यांचे आभार मानले पाहिजे. असे प्रतिपादन विजय वडेट्टीवार यांनी केले.नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी हजार पुरुष भेटले हे चांगले झाले. मतासाठी हे सरकार बरबाद करून ठेवल आहे. मत मिळवण्यासाठी ही योजना आणली आहे. आणखी शोधले तर खूप मिळतील. लोकांनी यांना हरवलं होतं ही योजना आणून मत मिळवण्याच्या प्रयत्न या सरकारने केलं. त्यांनी योजना आणली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
कोकाटेंनी शनि देवाकडे जा पाप करा, शेतकऱ्यांचे काम नका करू, शेतकऱ्यांना भिकारी म्हणा... वरून अंगलट आलं की शनिदेवाचे सर्व दरवाजे उघडे आहेत शनिशिंगणापूरला कोणी दरवाजेही लावत नाही... नोटाची बॅग ठेवणारे हे सरकार आहे. साडेसाती लागली आहे ते पुन्हा वाढलेली आहे.. कोकाटे मंत्रीपदापासून दूर जाणार नाही तेव्हापर्यंत शनिदेव त्यांच्या पाठीमागे हात धुवून पाठीमागे लागेल. शनिदेव पाठीमागे लागावे अशी मी शनि देवाकडे प्रार्थना करतो. आम्ही काळे कपडे घालतो मात्र यांचे काळे तोंड पोहोचू दे अशी प्रार्थना करतो.असेही विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले.