नागपूर : दिव्या देशमुखने पटकवला वर्ल्डकप 

नागपूर : दिव्या देशमुखने पटकवला वर्ल्डकप 
  • MG News
  • जुलै 28 2025

Share on  

जगातील तिसरी महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुद्धिबळ वर्ल्डकप मध्ये दिव्या देशमुखने विजेतेपद मिळवले. या विजयाबरोबर तीला ग्रँडमास्टर हे टायटल देखील मिळाले. ग्रँडमास्टर हे टायटल मिळवणारी ती भारताची पाचवी तर महाराष्ट्राची दुसरी  महिला बुद्धिबळपटू आहे‌. दिव्याने  जॉर्जिया देशातील बाटुंगी या शहरात झालेल्या महिलांच्या वर्ल्डकपमध्ये सुरवातीपासूनच धडाकेबाज खेळ केला आणि तिच्यापेक्षा सरस असणाऱ्या  स्पर्धकांना हरवले.त्यामुळे तीच्याकडे सुरवातीपासूनच संभाव्य विजेती म्हणून बघीतले जात होते. वर्ल्डकपच्या अंतीम सामन्यात  भारतातील क्रमांक एकची महिला खेळाडू  ग्रँडमास्टर कोनेरू हंपी यांना हरवत तीने विजेतेपद मिळवले. अंतीम सामन्यात पारंपारीक पद्धतीने खेळवण्यात आलेले दोन्ही डाव बरोबरीत सुटल्याने विजेती निश्चित करण्यासाठी जलद पद्धतीने सामना खेळवण्यात आला. ग्रँडमास्टर कोनेरु हंपी या जलद पद्धतीचे बुद्धिबळ उत्तम खेळणाऱ्या बुद्धिबळपटू म्हणून ओळखल्या जातात.मात्र त्याचे दडपण न घेता जलद पद्धतीत त्यांच्यावर दिड विरूद्ध अर्धा गुण मिळवत दिव्याने विजेतेपद मिळवले‌. 
दिव्याने मागच्याच वर्षी अहमदाबाद येथे झालेल्या १९वर्षीखालील मुलींच्या गटात पारंपारिक पद्धतीने खेळवण्यात येणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद मिळवले होते. तसेच ती  महिलांच्या गटात राष्ट्रीय विजेती देखील आहे.

संबंधित बातम्या