सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे यांची संयुक्त पत्रकार परिषद
रोहिणी खडसे, म्हणाल्या, प्रिया फुके यांना सर्मथन देण्यासाठी आम्ही आलो, राजकारणाचा विषय नाही, मदतीची अपेक्षा आहे.सत्ताधारी पक्षातील लोकांवर गुन्हे दाखल होत नाही. सरकारने लाडकी बहीण म्हणून त्यांना मदत करावी, महिला आयोगाकडून अपेक्षा होती.
सुषमा अंधारे म्हणाल्या, महिला आयोग हा पक्षाचा कामात व्यस्त आहे.पोलिसांवर गंभीर आरोप केले, यात प्रिया फुके यांनी चौकशीसाठी येण्यासाठी अनेक पत्र पाठवले, महिला आयोगाने दखल घेतली नाही. 12 मे 2025 ला विनयभंग तक्रार दिली, यात तक्रारदार याने उलट प्रिया फुकेवर अॅ्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला.भाजप सत्ताधारी कुटुंबातील आहे, भाजपमध्ये घेऊन त्यांना राजकारण करावे.
मुख्यमंत्री यांना विनंती आहे, चौकशीच्या नावावर होणारा त्रास थांबवावा, अजित पवार यांनी प्रिया फुके यांना चिल्लर न समजावता, पक्षाकडे असलेल्या महिला आयोगाकडे लक्ष द्यावे.
प्रिया फुके म्हणाल्या; परिणय फुके विरोधात पुरावे दिले आहे. परिणय फुके माझ्या पतीचे भाऊ आहे, त्यांच्या संपत्तीचा अर्धा भाग आहे, अर्ध्या संपत्तीची मागणी केली आहे
सुषमा अंधारे म्हणाल्या, रात्री बाहेर काढून घरातून हाकलले, धमकी दिली आहे. शारीरिक मानसिक छळाची तक्रार आहे. आपल्याकडे हिंदू विवाह कायद्यानुसार संपतीवर अधिकार असतो, संकेत फुके यांचा मृत्यू आजाराने झाला आहे, त्यामुळे सुनेने संपत्ती मागणे हे स्वभावीक आहे. माझे सासू सासरे यांनी माझ्या मुलांची कस्टडी केस मागवली आहे, मला पैसे द्या असे कधीही म्हटलं नाही.
रोहिणी खडसे म्हणाल्या, परिणय फुके हे भाजपचे आमदार आहे, एक महिला त्याच्या भावाची पत्नी आहे मुख्यमंत्री यांनी चर्चेतून मार्ग काढावा.
पुणे प्रकरण
दोन महिलांमधील मत्सर संपत असेल तर चांगलं आहे, चाकणकर यांची पाठराखण करतांना दाखवली ती त्तपरता तटकरेंनी हगवणे कुटुंबांना का दाखवली नाही? 498 A आणि B असे दोन पर्याय आहे, यात गैरवापर वाटत असेल तर काय करावे?
चित्रा वाघ म्हणाल्या की,
या बाई सोयीनुसार पलटतात. या बाई हगवणे व इतर प्रकरणात तत्परतेने का घेत नाही. चाकणकराची पाठराखण करण्यासाठी सुनील तटकरे तत्परतेने पुढे आले. आणि क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केला. सुनील तटकरेंनी चाकणकर यांच्या बद्दल दाखवलेली तत्परता हगवणे कुटुंबियांना भेटण्याबद्दल दाखवायची होती. तीच तत्परता संजय शिरसाट यांच्या प्रकरणात घेऊन ती महिला स्वतःहून माघार घेतली की त्याच्यावर दबाव टाकला याबद्दल घ्यावी होती. सिलेक्टिवपणा का तुमचा पक्षपातीपणा यावर आमचा खरा आक्षेप आहे
नाशिक शिवसेना पदाधिकारी राहुल गांधी स्टेटमेंट
मला याबद्दल काही माहिती नाही मला माहिती करून घ्यावी लागेल. कोणी काही म्हटलं त्याच्यावरून लगेच बोलणं योग्य नाही
आशिष शेलार बॅनर म्हणाले गेली पाच-सहा वर्ष पालिकेची निवडणूक झाली नाही. आणि त्यामध्ये बसलेले प्रशासक हा राज्य सरकारच्या अख्यातरीत आहे. राज्य सरकारने जाणीवपूर्वक पालिकेच्या निवडणुका होऊ दिल्या नाही. त्यामुळे पालिकेची मान्सूनपूर्व कामे करून घेण्याची जबाबदारी प्रशासक म्हणून राज्य सरकारची आहे. त्या कामांचा राज्य सरकारने आढावा का घेतला नाही. अगदी 17 दिवसांपूर्वी ज्या मेट्रोच उद्घाटन झालं त्याचे अक्षरशा धिंडवडे निघाले
भाजपचे स्वयंघोषित हिंदुत्ववादी नेते जे स्वतःला आपणच फार मोठे हिंदुत्वाचे मसीहा आहोत असे म्हणवून घेतात. कोकणातले भाचे मुस्लिमांकडून भाजीपाले घ्यायची नाही नो बिंदी नो सिंदूर चा हॅशटॅग चालवतात. त्यांना विचारायचे मेट्रोचा कॉनक्ट देण्यासाठी पाकिस्तानला खुलं समर्थन देणाऱ्या तुर्कीस्तानची कंपनी का भेटली
राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र ते येत असतील तर आमचे पक्षप्रमुख त्याबद्दल निर्णय घेतील.
नारायण राणे आणि त्यांची चिल्ली पिल्ले ते मंत्री झाले तरी त्यांना त्यांचा औरा जपता येत नाही. ते काय म्हणतात याच्याने आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांच्या म्हणण्याला आम्ही खिजगीत धरत नाही.