नागपूर :कोकाटेंनी स्वत: आपली भुमिका व्यक्त केलीय, त्यामुळे चौकशी होईल - चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर :कोकाटेंनी स्वत: आपली भुमिका व्यक्त केलीय, त्यामुळे चौकशी होईल - चंद्रशेखर बावनकुळे
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

कोकाटे यांनी स्वतः भूमिका व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी काल चौकशीनंतर सर्व समोर येईल असे मत व्यक्त केले होते.  आता कोकाटे स्वतः त्या संदर्भात बोलले आहे. त्यामुळे मी त्यावर काही बोलणे योग्य ठरणार नाही, असे प्रतिपादन महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

जर प्रकृती बिघडली असेल, आणि पदावर राहून न्याय देऊ शकत नसेल, तर राजीनामा द्यावा लागतो. त्यांनी कारण सांगितले आहे. धनखड निष्कलंक व्यक्ती आहे. त्यांच्याबद्दल असे संशय घेणे योग्य नाही. महाविकास आघाडीमध्ये प्रचंड वाद आहे, अधिवेशनाच्या शेवट ची पत्रकार परिषद ही ते एकत्रित करू शकले नाही. वेगवेगळी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यावरून समजून जा की विरोधी पक्षनेता कोण होईल तिघेही आपापसात भांडत आहेत असेही चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले

संबंधित बातम्या