नाना पटोले म्हणत होते की, बॅलेटवर निवडणूक घ्या, आता सहकारी बँकेच्या झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलचा पराभव झाला.नाना पटोले यांनी ग्रामपंचायतीकडे लक्ष द्यावे. राज्यात त्यांना स्कोप नाही असे प्रतिपादन आमदार परिणय फुके यांनी केले.
कोकाटे यांचा राजीनामा हा निंर्णय कॅबिनेटमध्ये होत नाही. मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील. याबाबत आज कॅबिनेट बैठकीत काही चर्चा नाही.राजकारणात कोणाचे वैरी नसतात, त्यामुळे वेगवेगळ्या कारणासाठी एकमेकांची भेट घेत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची भेट झाली,यात चर्चा करण्यासारखे काही विशेष नाही,असेही आमदार परिणय फुके पुढे म्हणाले