जोपर्यंत भारतीय सेना अधिकृत घोषणा करत नाही. तो पर्यत आमचा सरकारवर विश्वास नाही. पहलगाम घटनेतील हल्लेकरी मारले यासंदर्भात आम्हाला या लबाड सरकारवर विश्वास नाही. पहिले इतके दिवस शोधण्यासाठी कशाला लागले? देशात लपून असलेले आतमध्ये शोधण्यात वेळ का जात आहे. देशात घुसून मारले जाते. अधिकृतपणे भारतीय सैन्य याची पुष्टी होत नाही.. तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवत नाही.असे प्रतिपादन विजय वडेट्टीवार यांनी केले.
इजा बिजा तीज्या आता त्यांना काय म्हणायचे. मला माहित नाही. कोकाटे ते डागी मंत्री आहे. सरकारने निर्णय घेतला नाही, तर सरकारची काम करण्याची पद्धत शेतकरी किंवा जनतेच्या विरोधात बेईमानीची आहे. आणि सरकार नालायक आहे, असा शिक्का लागला जाईल. अशा कलंकित मंत्र्यांना जर त्यांना काढायचं नसेल तर गोमुत्र शिंपडा मग शुद्ध होतील, श्रावणमास सुरू आहे. शुद्ध गायीचं गोमुत्र शिंपडायला हरकत नाही. अभिषेक करा शंकराच्या पिंडीपुढे बसवा शुद्ध करून घ्या.
महामंडळाचे वाटप हा नवीन लॉलीपॉप आहे .तीन पक्षांची कार्यकर्त्यांची फौज मोठी आहे. कोणाला काय मिळणार ?निवडणुकीसाठी नवीन एक फंडा आहे. मंत्री दाबून खात आहे. कार्यकर्ते मात्र निराश आहे. कार्यकर्त्यांना नवीन एक चॉकलेटदेण्याचे काम होत आहे असेही विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले.