NANDED | उद्या नांदेड येथे काँग्रेस पक्षाच्या "जय जवान, जय किसान" तिरंगा महारॅली

NANDED | उद्या नांदेड येथे काँग्रेस पक्षाच्या
  • MG News
  • मे 27 2025

Share on  

उद्या नांदेड येथे काँग्रेस पक्षाच्या "जय जवान, जय किसान" तिरंगा महारॅलीचे आयोजन 

 उद्या दिनांक 28 मे रोजी नांदेड शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत तिरंगा महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शहरातील नवा मोढा येथील काँग्रेस कार्यालय येथे सपकाळ यांचे मार्गदर्शन होवून कार्यालयापासून ते मॉं फुले पुतळा, शिवाजी नगर, कला मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, येथून जिल्हाधिकारी कार्यालय येथे सपकाळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. या रॅलीत चार ते पाच हजार कार्येकर्ते उपस्थित राहणार असल्याचे खा. रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

संबंधित बातम्या