नाशिक : गेल्या १०० वर्षांपासून केवळ नाशिक नव्हे तर देशविदेशात ग्राहकांची पसंती असलेल्या कोंडाजी चिवड्याचा नवव्या शाखेचे उदघाटन नुकतेच रविवार कारंजा येथे झाले.यावेळी संचालक सुरेश वावरे, अरुण तिडके, नरेद्र बोरा , राजेंद्र परदेशी, तनसुख ठक्कर, सचिन भोसले, अक्षय भोसले आदींसह विविध मान्यवर आणि हिंतचिंतक उपस्थित होते.
रविवार पेठ येथील सुप्रसिद्ध चांदीच्या गणपती मंदिरासमोर परदेशी बिल्डींगमध्ये हि शाखा कार्यान्वित झाली आहे. कोंडाजी चिवडा यांचे मका चिवडा, कच्च्या पोह्याचा चिवडा, जैन चिवडा आदी विविध प्रकारचे चिवडे या ठिकाणी विक्रीस उपलब्ध असतील
या नव्या शाखेमुळे गेली १०० वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या कोंडाजी चिवडा अधिक सुलभतेने ग्राहकांपर्यत पोहोचण्यास मदत होईल. आमच्या भद्रकाली येथील मुख्य शाखेसह इतर शाखांना जसा ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळतो तसाच उदंड प्रतिसाद याही शाखेला मिळेल असा मला विश्वास असे कोंडाजी चिवड्याचे संचालक सुरेश वावरे म्हणाले.