मालेगावच्या दाभाडी जिल्हा परिषद शाळेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ए आय रोबोटिक लॅबचा शुभारंभ करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील या प्रकारची ही पहिलीच लॅब आहे. जवळपास ८ खोल्यांची ही लॅब असून, त्यात विद्यार्थ्यांना एआय रोबोटिक ड्रोन, बायोलॉजी, केमेस्ट्री आदींचे ज्ञान मिळणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांसोबतच जिल्हा परिषदच्या शिक्षकांना देखील शिक्षण देणार असल्याने, भविष्यात जिल्हा परिषदेचे शिक्षक विद्यार्थ्यांना ए.आयचे शिक्षण देतील.