नाशिक : चांदवड तालुक्यात भाजपा कडुन ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव फटाके वाजवून जल्लोष साजरा

नाशिक : चांदवड तालुक्यात भाजपा कडुन ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव फटाके वाजवून जल्लोष साजरा
  • MG News
  • मे 8 2025

Share on  

नाशिक : चांदवड तालुक्यात भाजपा कडुन ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव फटाके वाजवून जल्लोष साजरा.

   चांदवड तालुका भाजपा कडून भारतीय सैन्य दलाचे शौर्य अभियान ऑपरेशन सिंदूर बद्दल विजयोत्सव साजरा करण्यासाठी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून , तिरंगा ध्वज फडकवत, भारत माता की जय च्या घोषणा देत जल्लोष केला. पाकिस्तानने वारंवार परमाणु हल्ल्याची दिलेल्या पोकळ धमकीला न जुमानता भारतीय सैन्य दलाने पहेलगाम हल्ल्याचा प्रतिशोध घेत मृत भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत भारतीय नागरिकांना न्याय मिळवून दिला. याप्रसंगी मंडळ अध्यक्ष मनोज शिंदे, गीताताई झाल्टे, ज्येष्ठ नेते अशोक काका व्यवहारे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब वाघ, वर्धमान पांडे, व्ही. बी. चव्हाण तात्या, सुनील शेलार, राजेंद्र गांगुर्डे, सुनील डुंगरवाल, महेंद्र कंकरेज, कैलास गुंजाळ, बाळा पाडवी, देवा पाटील, संतोष क्षत्रिय, महेश खंदारे, मुकेश आहेर, विशाल ललवाणी, विठ्ठल आवारे, बापू सोमवंशी, पिंटू भोईटे, विजय धाकराव, प्रविण ठाकरे, संजय चौबे, गणेश ठाकरे, संतोष ढोमसे, विशाल ठाकरे, आप्पा गांगुर्डे, शंकरराव आहेर, बापू शिंदे, प्रदीप वानखेडे, सुनील ढोके, गोकुळ वाघ, बबन दरेकर, आत्माराम खताळ, आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मनोज शिंदे व गीता झाल्टे यांनी अधिक माहिती दिली.

संबंधित बातम्या