नाशिक :घरगुती गॅसचा काळाबाजार उघड 

नाशिक :घरगुती गॅसचा काळाबाजार उघड 
  • MG News
  • जून 18 2025

Share on  

गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण माळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई करत उपनगर पोलीसांनी वडाळा-डीजीपीनगर रस्त्यावरील महाराष्ट्र मोटर्सच्या मागे नाल्यालगत पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेला  घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार उद्ववस्त केला.  या प्रकरणी मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून सोपान अडांगळे या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. तसेच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे‌.
शहरात लपूनछपून अवैध धंदे करणाऱ्यांची माहिती काढत कायदेशीर कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते. त्यानुसार उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हेशाखेचे पथक आयुक्तालय हद्दीत गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना  पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस अवैधरीत्या व बेकायदेशीरपणे खासगी वाहनांमध्ये भरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार सदर कारवाई  मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.

संबंधित बातम्या