नाशिक शहरातील डेंग्यू रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जूनमध्ये २५ वर असलेली डेंग्यू रुग्णसंख्या जुलैत तिपटीने वाढली आहे. जुलैच्या गेल्या २८ दिवसात तब्बल ७५ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. यामध्ये नाशिकरोडमध्ये सर्वाधिक २३ तर त्याखालोखाल सातपूरमधील १४ रुग्णांचा समावेश आहे
शहरात पावसाळा सुरू होताच डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढला आहे. मे महिन्यात पासून सुरू झाल्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्याही वाढत आहे. जानेवारीत ३७ डेंग्यू रुग्ण आढळले होते. फेब्रुवारीत ३२, मार्च २१, एप्रिल १५, मे महिन्यात १७ तर जुन महिन्यात २५ रुग्ण आढळले होते. जुलैच्या गेल्या २८ दिवसातच डेंग्यू रुग्णसंख्येत तिपटीने वाढ झाली आहे. जुलै महिन्यात डेंग्यूचे ७५ रुग्ण आढळले आहेत. त्यात नाशिकरोड विभागातील सर्वाधिक २३ रूग्णांचा समावेश आहे.