नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी पूजा खेडकरचे ओबीसी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र रद्द केले आहे. पूजा खेडकर ही भारतीय प्रशासकीय सेवेची माजी प्रशिक्षणार्थी असून तिच्यावर २०२२ ची नागरी सेवा परीक्षा खोटी ओळख व बनावट कागदपत्रे वापरून पास केल्याचा आरोप आहे.
ओबीसी नॉन क्रिमीलेयरचे आरक्षण घेण्यासाठी उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असते. पूजान खेडकरने आपल्या कुटुंबाचे वार्षिक ६ लाख रुपयाचे असल्याचे दाखवले होते. मात्र चौकशीत तिच्या कुटुंबाकडे २३ जंगम मालमत्ता आणि १२ गाड्या असल्याचे समोर आले. पूजाचे वडील दिलीप खेडकर हे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी होते आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार निवडणूक लढवताना ४० कोटींची संपत्ती जाहीर केली होती.