Nashik  लेकराला वाचविताना आईचाही दरीत पडून मृत्यू; मांगीतुंगी डोंगरावरील हृदयद्रावक घटना

Nashik  लेकराला वाचविताना आईचाही दरीत पडून मृत्यू; मांगीतुंगी डोंगरावरील हृदयद्रावक घटना
  • MG News
  • मे 28 2025

Share on  

 लेकराला वाचविताना आईचाही दरीत पडून मृत्यू; मांगीतुंगी डोंगरावरील हृदयद्रावक घटना
 पायऱ्यांवर पाणी असल्याने बूट ओले होतील यामुळे राजवीर पावरा (वय ५) याने बूट काढून पायरीशेजारील संरक्षक भिंतीवरून तो चालू लागला. चालताना पाय घसरल्याने तो पलीकडे कोसळू लागला.म. टा. वृत्तसेवा, सटाणा: बागलाण तालुक्यातील जैन धर्माचे तीर्थस्थान असलेल्या मांगीतुंगी येथे पाचवर्षीय बालकाचा पाय घसरून तो खाली पडल्याने त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या मातेचाही दरीत कोसळून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली.
जायखेडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २७) कळवणच्या अभोणा येथील सुनील पावरा, पत्नी गीता आणि आपल्या दोन मुलांसह मांगीतुंगी येथे पर्यटनासाठी आले होते. दुपारी चारच्या सुमारास ते मुख्य मूर्तीच्या पुढील पायरी चढत होते. मात्र, पायऱ्यांवर पाणी असल्याने बूट ओले होतील यामुळे राजवीर पावरा (वय ५) याने बूट काढून पायरीशेजारील संरक्षक भिंतीवरून तो चालू लागला. चालताना पाय घसरल्याने तो पलीकडे कोसळू लागला. हे पाहताच आई गीता यांनी धाव घेतली. मात्र, यात दोघेही खोल दरीत कोसळले.डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यापुढे पायरी चढत असलेले वडील सुनील व मोठा मुलगा यांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा केल्याने काही पर्यटक धावले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. बापलेकाने ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. रात्री उशिरा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले.

संबंधित बातम्या