नाशिक : घोटी मध्ये महावितरण आणि ठेकेदाराचा जाच : उदयोजक करणार नुकसान भरपाईचा दावा

नाशिक : घोटी मध्ये  महावितरण आणि ठेकेदाराचा जाच : उदयोजक करणार नुकसान भरपाईचा दावा
  • MG News
  • फेब्रुवारी 17 2025

Share on  

वर्षा स्टोन क्रेशरवर विद्युत पुरवठा देण्यास इगतपुरी महावितरन ची टाळाटाळ 


प्रतिनिधी | घोटी

इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात नव्यानेच सुरु झालेल्या वर्षा स्टोन क्रेशरवर अनेक आदिवासी कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे मामात्र इगतपुरी तालुका महावितरण कंपनी विद्युत पुरवठा देण्यास टाळाटाळ करत आहे. दरम्यान सबंधित मालक योगेश शिरसाठ यांनी महावितरण कंपनीची कायदेशीर रक्कम भरली असताना देखील दि 3/10/2024 पासून शिरसाठ पाठपुरावा करत आहे मात्र यामध्ये महावितरण कंपनी व ठेकेदार हे जाणूनबुजून त्रास देण्याचं काम करत असल्याचा आरोप शिरसाठ यांनी केला असून याबाबत योगेश शिरसाठ यांनी दिलेल्या माहितीनुसार 315 KVA ट्रांसफार्मर साठी लीगली रक्कम दिली आहे त्यामध्ये महावितरण कंपनी चे ठेकेदार गिरीश ब्रम्हाणे यांना 1,50,000/- डिपॉजिट दिले व परत 19/11/24 8 लाख 28 हजार 663 रुपये रोजी quotation आणि सेक्युरीटी deposite भरले आहे त्यानुसार शिरसाठ यांनी नंतर दि. 2/1/25 रोजी 500000/- आणि 6/2/25 रोजी 400000/-  दिले. मात्र आज ठरलेल्या मुदती पेक्षा खूप उशीर होऊन सुद्धा अजून DP आणि लाइट connection झालेले नाही.  गेल्या महिन्यापासूनमशीन कनेक्शन शिवाय चालू होऊ शकलेले नाही. या मुळे शिरसाठ यांचे लाखो रुपयांचे नुकसान तर होतच आहे त्यातच ज्या स्टोन क्रेशर वर कामगार, ड्रायवर यांना पगार आणि बँकेचे हफ्ते ही भरता येत नाही तसेच युजिएल मार्केटिंग चे संचालक गिरीश ब्रम्हणे यांनी वर्षा स्टोन क्रेशर चे मोठया प्रमाणात नुकसान केले असून त्यांच्यावर नुकसान भरपाई व गुन्हा दाखल करण्यात येईल असे पत्र शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. 
शुक्रवार दि. 14/2/25 पर्यंत कनेक्शन करून द्याल पन तेही तुम्ही केलेले नाही.  जाणून बुजून कनेक्शन करत नाही आहात. त्यामुळे आता सबंधित मालक हतबल झाले आहे. म्हणून सबंधित मालक आता नुकसान भरपाई दावा दाखल करणार असून सर्व कामगार व मालक महावितरण कंपनी ला आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या