कौटुंबिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडलीये पूजा दीपक डांबरे असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती. व्ही. डी. कामगार नगर,अमृतधाम या ठिकाणी रहात होती.पुजाने बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम वर्षात प्रवेश घेत महाविद्यालयीन शिक्षण सुरु केले होते. पूजाचे वडील विभक्त राहत असून ती आईसोबत राहात होती.
कौटुंबिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे पूजा गेल्या काही दिवसांपासून खचून गेली होती. आई पोलिस खात्यात कार्यरत असल्याने दोघींवर कौटुंबिक आणि घरच्या जबाबदाऱ्यांचा ताण होता. या तणावातूनच पूजाने राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. हा प्रकार लक्षात येताच तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुजाने आत्महत्येपुर्वी चिठ्ठी लिहली असून यात तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च फार आहे. तू काळजी करू नकोस. तुझी धावपळ होते, असा मजकुर आहे.