नाशिक :वाडा कोसळला ,सुदैवाने जीवितहानी नाही

नाशिक :वाडा कोसळला ,सुदैवाने  जीवितहानी नाही
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

जुने नाशिक परिसरातील चौक मंडई येथील एक जुना वाडा कोसळल्याची घटना घडलीये. वाडा बंद असल्याने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली,  कोसळलेल्या वाड्याचा ढिगाऱ्याखाली एम एच १५ इएच  १८६६ या क्रमांकाची  रिक्षा आणि एम एच १५ जेके ०२१२  क्रमांकांची एक्सेस तसेच एम एच १५ जेके ५४२९ क्रमांकाची पल्सर या गाड्या  अडकलेल्या होत्या.  वाड्याचा कोसळलेल्या भागाचा ढिगारा उपासल्यावर या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले.  मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असलेल्या या भागातील   कोसळलेल्या   वाड्याचा उर्वरित भाग काढून घेण्याच्या सूचना मालकाला  दिल्याचे यावेळी अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले 

संबंधित बातम्या