चांदवड तालुक्यातील उसवाड गावचे सरपंच संजय पवार व उपसरपंच रवी बिडगर, ग्रामपंचायत सदस्य भारत अहिरे भाऊसाहेब पवार ,जीभाऊ बटाव, पुंडलिक पवार , मोठाभाऊ शिंदे , वाल्मिक शिंदेसह यांसह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला . गेल्या वीस वर्षापासून हे पक्षात काम करीत होते. भुजबळ फार्म येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला.
यावेळी छगन भुजबळ यांनी पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांचा फुल गुच्छ देऊन सत्कार केला.