नाशिक: सूर्या अकॅडमीकडून लष्करभरतीच्या नावाखाली ११लाखांची फसवणूक

 नाशिक: सूर्या अकॅडमीकडून लष्करभरतीच्या  नावाखाली ११लाखांची फसवणूक
  • MG News
  • जून 19 2025

Share on  

नाशिक येथील सूर्या अकॅडमीने लष्कर व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या नावाखाली युवकांना मोफत टॅब व साहित्याचे आमिष दाखवून ५४ प्रशिक्षणार्थींची तब्बल ११लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संस्थेचे संचालक योगेश पानसरे यांच्याविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थी विजुमाला वाघमारे(२७,आडगाव) यांनी या संदर्भात तक्रार दिली. पानसरे संचलित अशोक स्तंभ येथील प्रथमेश फाउंडेशनच्या सूर्या अकॅडमीत भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी जाहिरात करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार प्रत्येक प्रशिक्षणार्थ शिष्यवृत्ती व्यतिरिक्त संस्थेच्या वतीने सर्वांची साहित्य व ५जी टॅब मोफत दिले जाणार होते. या आमिशाला बोलून ५४ युवक युवतींनी  संस्थेत प्रवेश घेतला. सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊनहि विद्यार्थ्यांना वचन दिलेले साहित्य देण्यात आले नाही, विचारणा केल्यावर संचालकाने ची उत्तरे दिली आणि जातीवाचक शिवेगाळा केल्याचा आरोप आहे. तक्रारीनंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या हस्तक्षेपामुळे रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. 

संबंधित बातम्या