नाशिक : प्रशासनाबरोबर काम करण्यास तान उत्सुक

नाशिक : प्रशासनाबरोबर काम करण्यास तान उत्सुक
  • MG News
  • जुलै 27 2025

Share on  

नाशिकमध्ये कुंभमेळ्यानिमित्त पर्यटनाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत .यातून रोजगार निर्मिती व्हावी  यासाठी ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ नाशिक (तान) प्रशासनाबरोबर काम करण्यासाठी  सदैव उत्सुक आहे. प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद द्यावा.असे तान'चे अध्यक्ष सागर वाकचौरे यांनी सांगितले.एका  वृत्तपत्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्या घरी कोणी येणार असेल तर आपण घर व्यवस्थित व नीटनेटके ठेवतो, त्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने शहराचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून नाशिकबद्दल भाविक व पर्यटकांना कायम आकर्षण राहील. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून भविष्यातही नाशिकनगरीचा निश्चितच सर्वांगीण विकास होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.यावेळी  तानचे उपाध्यक्ष मनोज वासवानी, सत्यनारायण चौधरी, अमित चंदेल, अंबरीश मोरे, मनोज वासवानी, अरुण सूर्यवंशी, रश्मी ठाकूर, समीर देशमुख आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या