नाशिक : काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

नाशिक : काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
  • MG News
  • जुलै 28 2025

Share on  

 इमारतीमध्ये लिफ्टचा वापर आता सर्वसामन्य झाला आहे.मात्र ही लिफ्ट मध्येच बंद पडली तर ..असाच अनुभव पंडित कॉलनी येथील सिद्धी पूजा बिझनेस सेंटर या इमारतीत असणाऱ्या एका फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या चौघांना आला.अडकलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने इमारतीचे चेअरमन तसेच अन्य लोकांशी संपर्क साधत त्यांना मदत पाठविण्याचे आवाहन केले. अग्निशामक विभागास घटनेची माहिती मिळाली. लीडिंग फायरमन व्ही. एन. शिंदे, डी. आर. लासुरे, संत्रास, कुटे, गायकवाड, ठाकरे घटनास्थळी दाखल झाले. सर्वांशी संपर्क साधने, मदतीसाठी प्रतीक्षा करणे, अशात बराच वेळ वाया गेल्याने चौघांमध्ये भीती निर्माण झाली होती.
सुदैवाने अग्निशामक कर्मचारी अवघ्या काही मिनीटात घटनास्थळी पोचल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. लिफ्टची मास्टर चावी नसल्याने दरवाजा उघडण्यास अडचण निर्माण झाली. शेवटी अग्निशामक पथकाने वेळ वाया जाऊ न देता हायड्रोलिक स्प्रेडरच्या साह्याने दरवाजा तोडून चौघा तरुण सुखरूप बाहेर काढले. यश पाटील, कुणाल चावले, प्रशांत दानी आणि पलानी तेवर अशी सुटका करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

संबंधित बातम्या