NAVI MUMBAI | अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्याविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

NAVI MUMBAI | अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्याविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 
  • MG News
  • मे 28 2025

Share on  

अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्याविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

नवी मुंबईमध्ये एका अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा धक्कादायक प्रकार एनआरआय परिसरातून समोर आला आहे. तर एका अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा गुन्हा NRI पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. 
पीडित मुलगी ही दहा वर्षाची असून, डिसेंबर २०२४ मध्ये ही घटना घडली होती. मात्र, मुलीने भीती पोटी हे कोणालाही सांगितले नाही. अलीकडेच या बद्दल तिने आपल्या वडिलांना सांगितले असता वडील मुलीला घेऊन तातडीने पोलिस ठाण्यात दाखल झाले आणि घडलेला प्रकार सांगितला. या प्रकाराबद्दल एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस एसीपी मयूर भुजबळ यांनी सांगितले आहे.
 

संबंधित बातम्या