NAVI MUMBAI | एमीवे बंटाय उर्फ प्रसिद्ध हिप हॉप गायक बिलाल शेखला जीवे मारण्याची धमकी; नवी मुंबईमध्ये गुन्हा दाखल 

NAVI MUMBAI | एमीवे बंटाय उर्फ प्रसिद्ध हिप हॉप गायक बिलाल शेखला जीवे मारण्याची धमकी; नवी मुंबईमध्ये गुन्हा दाखल 
  • MG News
  • मे 28 2025

Share on  

 एमीवे बंटाय उर्फ प्रसिद्ध हिप हॉप गायक बिलाल शेखला जीवे मारण्याची धमकी; नवी मुंबईमध्ये गुन्हा दाखल 

एमीवे बंटाय म्हणून प्रसिद्ध हिप हॉप गायक बिलाल शेखला जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. बंटाय म्युजिक कंपनीच्या मोबाईल वर मेसेज द्वारा धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने मी गँगस्टर गोल्डी ब्रार असून, तुझ्या सिंगरकडे 24 तास आहेत. 1 कोटी रुपये दे नाहीतर मारून टाकू, अशी धमकी देण्यात आली. यापुढे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई ग्रुप, गँगस्टर लॉन ग्रुप, गँगस्टर रोहित गोदरा असा संदेश लिहिण्यात आलाय. कालच एमीवे बंटाय म्हणून प्रसिद्ध हिप हॉप गायक बिलाल शेख याने ट्रिब्युट टु सिद्धू मुसेवाला हे गाण प्रसिद्ध केलं होतं. ट्रिब्युट टु सिद्धू मुसेवाला हे गाण प्रदर्शित केल्यानंतर धमकी आल्याने प्रकरण गंभीर आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
 

संबंधित बातम्या