विधिमंडळ हाणामारी प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या सर्जेराव टकलेची गोपीचंद पडळकर समर्थकांकडून कळंबोलीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. हार घालून स्वागत करत ढोलताश्यांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली.गुन्हेगारीला समर्थन करणारे कृत्य केल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.