कोणत्याही बँकेकडून खातेदाराला देण्यात आलेला चेक खराब झाला, गहाळ झाला तर लगेच विनाविलंब बँकेला कळवण्याविषयी सांगण्यात येते.मात्र हे न करणे किती महागात पडु शकते याचा अनुभव दिल्लीतील केटीला आला.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २४जुलै २०२५ रोजीची आहे, केटीला असं कळलं की तिच्या नावानं सिमडेगा येथील एका बँकेत कोणीतरी पाच लाख रुपयांचा चेक वठवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र केटीने कोणालाही कधीच पाच लाख रुपयांचा चेक दिला नव्हता. मॅनेजरला शंका आल्यानं त्याने तातडीने दिल्ली पोलिसांशी संर्पक साधला, तेव्हा त्याला असं कळालं की हा चेक केटी नावाच्या महिलेचा असून तो तिच्या घरातून चोरी झाला आहे. केटीशी पोलिसांनी संपर्क साधल्यावर केटीने काही दिवसापुर्वी तिच्या घरात काम करणाऱ्या राणीवर संशय व्यक्त केला.
त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आणि राणी सिमडेगा येथे जिथे राहात होती, त्या घरावर छापा टाकला, तिला अटक केली. तिने चौकशीमध्ये आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.