सलग पंतप्रधानपदी राहण्याचा इंदिरा गांधीचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी मोडला आहे.नरेंद्र मोदी यांनी सलगपणे भारताचे पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले आहेत. सलग हे पद भूषवण्याच्या बाबतीत त्यांनी इंदिरा गांधींना मागे टाकलं आहे. इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ असे सलग ४०७७ दिवस भारताच्या पंतप्रधान म्हणून कारभार पाहिला होता. तर मोदी २६ मे २०१४ पासून या पदावर आहेत. २५ जुलै २०२५ रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले आहेत.
सलग सर्वाधिक काळ भारताचं पंतप्रधानपद भूषवण्याच्या बाबतीत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आघाडीवर आहेत. त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ पर्यंत सलग ६,१२६ दिवस (१६ वर्षे २८६ दिवस) भारताचं नेतृत्त्व केलं आहे. मोदी यांना नेहरुंचा हा विक्रम मोडण्यासाठी आणखी २०४८ दिवस भारताचं नेतृत्त्व करावं लागले. त्यासाठी त्यांना व भाजपाला पुढची म्हणजेच २०२९ ची लोकसभा निवडणूक देखील जिंकावी लागेल.