सर्वोच्च न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायालयाने जूलै २००६च्या बाँब स्फोटाविषयी दिलेल्या निकालाला स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २००६ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील सर्वच्या सर्व १२ आरोपींना निर्दोष ठरवण्याचा निकाल दिला होता.
मुंबईतील सात लकल ट्रेनमध्ये ११ जुलै २००६ रोजी एकाच वेळी बॉम्बस्फोट झाले होते. या हल्ल्यात दोनशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर सातशेहून अधिक लोक जखमी झाले होते. एनआयए ने या प्रकरणात १२ लोकांना अटक केली. २०१५ मध्ये विशेष न्यायालयाने ५ जणांना मृत्युदंड, तर ७ जणांना जन्मठेप सुनावली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने २०२५ मध्ये आरोपींना गैर पुराव्याच्या आधारे निर्दोष ठरवले. सर्वोच्च न्यायालय आता या प्रकरणाची सविस्तर सुनावणी घेणार आहे. तोपर्यंत आरोपी तुरुंगातच राहणार आहेत.