अरे व्वा ! डिव्हायडर नसताना रंगरंगोटी केडीएमसीने काढले बील, मनसेचे आंदोलन
कल्याण स्टेशन परिसरातीत डिव्हायडर नसताना त्याची रंगरंगोटी करुन कल्याण डोंबिवली महापालिकेने कंत्राटदाराला बिल दिले आहे. त्याचबरोबर अन्य दोन रस्त्यावर डिव्हायडरची देखभाल दुरुस्ती बिल्डरला दिली होती. त्याठिकाणचे बिलही काढण्यात आले आहे. जवळपास 36 लाखांचे बिल काढण्यात आले आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात मनसेने आज गुरुदेव हॉटेल चौकानजीक रस्त्यावर नसलेल्या डिव्हायडरची प्रतिकात्मक रंगरंगोटी करण्याचे आंदोलन केले. या भ्रष्टाचारीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.