पंढरपूर अबब तब्बल तीन किलोचा आंबा! आंब्याला चक्क शरद पवारांचं नाव
शेतकऱ्याने आपल्या बागेत तीन किलो वजनाचे आंबे पिकवले असून, त्यांना 'शरद मँगो' असं नाव दिलं आहे. त्यामुळे हा आंबा पाहण्यासाठी सोलापुरात आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही लोक येत असून दत्तात्रय घाडगे यांचा शरद आंबा चांगलाच भाव खात आहे.या नव्या प्रकारच्या आंब्याची खासियत म्हणजे केवळ त्याचे वजनच नाही, तर त्यामागील संशोधनात्मक शेतीही आहे. घाडगे यांनी आपल्या आठ एकर शेतात 17 विविध आंबा प्रजातींची आंब्याची झाडें लावली आहेत. त्यात ग्राफ्टिंग करून हा प्रजाती विकसित केला आहे. विशेष म्हणजे, फळ बाग योजना या सरकारी योजनेचा लाभ घेत त्यांनी ही शेती केली. याच अनोख्या आंब्याला शरद मॅंगो, व संत सावता माळी यांच्या नावावरन अजून एका आंब्याला त्यांना पेटंट मिळालं आहे. 1992 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या फळबाग योजनेच्या आधारे दत्तात्रेय घाडगे यांनी आंबाच्या प्रयोगाला सुरू केली. त्यामुळे शरद पवारांच्या पूर्वपरवानगीने तीन किलोच्या आंब्याला शरद मॅंगो असं नाव देण्यात आले तसं पेटंट ही त्यांना मिळालं. दत्तात्रय घाडगे यांना खात्री आहे की, 'शरद मँगो' भविष्यात महाराष्ट्राचाच नाही, तर देशभरातील ओळख बनू शकतो.
शेतकऱ्यांना त्यातून एकरी 25 लाखांचं उत्पन्न मिळू शकत. भविष्यात शेतकऱ्याच्या आत्महत्या ही हे पीक चांगले उत्पन्न मिळवून देऊन रोखू शकत असा विश्वास दत्तात्रय घाडगे यांनी व्यक्त केला.
दत्तात्रय बाबुराव घाडगे, आंब्याची शेती करणारे शेतकरी