हनी ट्रॅप चा विषय हा माझ्यासाठी पूर्ण संपला आहे.संजय राऊत हे राज्यातील मंत्रिमंडळ हटवायला बसले आहेत. त्यांना वाटतं आमचं मंत्रिमंडळ जाऊन त्यांचे मंत्रिमंडळ येईल. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्याला गेले. ही संधी साधून संजय राऊत आपल्या तोंडाच्या वाफा सोडत आहेत. खोटं बोलत रेटून बोलत आहेत. असे प्रतिपादन गिरीश महाजन यांनी केले. मंत्री गिरीश महाजन हे आज त्यांच्या जामनेर मतदार संघातील नागरिकांच्या दिंडी समवेत पंढरपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते
एकनाथ खडसे आणि माझे मिटायचा विषय नाही. खडसे साहेबांना खूप बोलायचे आहे पण ते अस्वस्थ आहेत. त्यांच्या अस्वस्थता वाढत आहे. माधुरी मिसाळ आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये काही वाद असतील. काही मतभेद असतील तर मुख्यमंत्री यावर निश्चित तोडगा काढतील. असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.