सोयाबीनसह इतर धान्यांची चोरी करणारी टोळी पोलिसांनी केली जेरबंद, चार जण पोलिसांच्या ताब्यात तर तीन चोरटे फरार

सोयाबीनसह इतर धान्यांची चोरी करणारी टोळी पोलिसांनी केली जेरबंद, चार जण पोलिसांच्या ताब्यात तर तीन चोरटे फरार
  • MG News
  • मार्च 20 2025

Share on  

 

 मागील काही महिन्यांपासून धान्य चोरी करणारी टोळी जिल्ह्यात चांगगलीच सक्रीय झाली होती. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यापासून स्थागुशा चे पथक या टोळीवर तिरपी नजर ठेऊन होते.
धान्य चोरी करणाऱ्या टोळीचा माग घेत असताना पोलीसांना खबऱ्यामार्फत या टोळीची माहीती मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला असता. सदरील टोळीतील चार सांशयित आरोपी धान्यासह पोलीसांच्या हाती लागले.
बळीराम रावसाहेब कुटे (वय 23 वर्षे) रा.उमरखेड ता. भोकरदन, संदिप गणेश वाघमारे (वय 32 वर्षे),रा.सावखेड ता. दे.राजा,आनंद ऊत्तम मोरे (वय 32 वर्षे) रा. मंठा,प्रकाश राजू झिने (वय 22 वर्षे) रा. लोणगाव ता. भोकरदन या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोयाबीन व ईतर धान्यांच्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आले असून, या टोळीतील तीन आरोपी सध्या फरार आहेत. हे सात आरोपी दोन टोळ्यामार्फत जिल्ह्यामध्ये धान्य चोरीच्या घटनांमध्ये कार्यरत होते. या दोन्ही टोळींनी जाफराबाद येथे दोन, मौजपुरी येथे तीन,बदनापुर एक,भोकरदन एक,आणि मंठा एक, अशा प्रकारे एकुण आठ धान्य चोरीचे गुन्हे ऊघडकीस अले असल्याचे निष्पन्न झालेले आहे. हे धान्य चोरट्याने शेतकऱ्यांच्या शेतातून तर काही चोरी गोडाऊन मधून केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून सोयाबीन,हरभरा,तूर,गहू,ज्वारी असे एकुण 3 लाख 27 हजाराचे धान्य जप्त करण्यात आले असून गुन्ह्यात वापरलेली एक स्विफ्ट कार व पिकअप वाहन हे साडेसात लाखाचे वाहन असे एकुण 10 लाख 77 हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केले आहे. तर एकूण चोरी झालेल्या मालापैकी जवळपास पन्नास टक्के माल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सुतूराकडून मिळाली.
सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक पंज जाधव यांच्या पथकाने केली आहे.
 

संबंधित बातम्या