चोपड्यात मान्सून पूर्व नालेसफाईला सुरुवात

चोपड्यात मान्सून पूर्व नालेसफाईला सुरुवात
  • MG News
  • मे 27 2025

Share on  

चोपड्यात मान्सून पूर्व नालेसफाईला सुरुवात

चोपडा नगर परिषदेच्या वतीने मान्सून पूर्व नदी नाले सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातून जाणाऱ्या रत्नावती नदी तसेच इतर भागातून जाणाऱ्या नदी नाल्यांच्या गटारीची साफसफाई सुरु आहे. त्याचबरोबर शहरात जीर्ण झालेल्या काही इमारती आहेत त्या इमारती धारकांना खाली करण्यासंदर्भात सूचना देण्यात येत आहेत व शहरातील जी वृक्ष धोकादायक आहेत त्याच्या फांद्या छाटण्याचे काम देखील सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापना संदर्भात टोल फ्री क्रमांक देखील नागरिकांना देण्यात आला आहे. काही अडचण आली तर नागरिकांनी त्यावर संपर्क करावा असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे. 

संबंधित बातम्या