उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे नागरिकांना आवाहन

 उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे नागरिकांना आवाहन
  • MG News
  • मार्च 20 2025

Share on  

 

 उष्णतेच्या लाटेत आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तसेच उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे ,शरीराला हायड्रेट ठेवावे,आहार घेतांना हलकं आणि पोषणयुक्त आहार घ्या. फळे, भाज्या, ताक, लिंबू सरबत यांचा समावेश रोजच्या आहारात करावा.जड व मसालेदार अन्न टाळावे जेणे करून आरोग्य खराब होणार नाही.कपडे परिधान करतांना थंड व हलक्या रंगाचे परिधान करावे जेणेकरून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.सकाळी आणि संध्याकाळीच कामासाठी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करा.दुपारच्या वेळेस बाहेर पडू नये.

उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी यासंदर्भात जिल्हारुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय तसेच वैद्यकीय अधिकारी ना सूचना करण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी उष्माघात पासून आपले संरक्षण करण्यासाठी नियम पाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
 

संबंधित बातम्या