अकोल्यात उद्धव ठाकरे गटाने अबू आझमी विरोधात शेन फेक आंदोलन केले आहे. तर औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. अबू आझमींच्या वक्तव्याचे अकोल्यात पडसाद उमटले आहेत. आता अबू आझमी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करीत ठाकरे गटाने रास्ता रोको केला आहे. तसेच अबू आझमी यांच्या प्रतिमेवर शेन फेको आंदोलन करत त्यासोबतच गधा अब्बू आजमी अशी पोस्टर लावत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. अकोल्यातल्या गांधी चौकात ठाकरे गटाने हे आंदोलन केले आहे. ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.तर आंदोलन दरम्यान गांधी चौकातील सर्व ट्राफिक जाम झाली होती...!