पुणे : राजकीय आकसापोटी खेवलकरांना अटक :असीम सरोदे

पुणे : राजकीय आकसापोटी खेवलकरांना अटक :असीम सरोदे
  • MG News
  • जुलै 29 2025

Share on  

राजकीय आकसापोटी खेवलकरांना अटक करण्यात आली आहे. दृश्यम चित्रपटासारखं खोटं चित्र रंगवलंय. घरात दारू पिणं गुन्हा नाही. पण पोलिसांनी या प्रकरणाला रेव्ह पार्टीचं स्वरुप दिलं आहे.रेव्ह पार्टी वेगळी असते. तिथं मोठ्या आाजात संगीत, मोठ्या प्रमाणावर लोक, तोकडे कपडे, अफू, गांजा, नशिले पदार्थ यांचा समावेश असतो. पुणे पोलिसांनी कारवाई केली ते प्रकरण वेगळं आहे. एका ठिकाणी ते दारू, बिअर पित होते.असे प्रतिपादन असीम सरोदे यांनी केले.
 खेवलकर आणि इतरांना गुन्हेगार ठरवण्यासाठी पुरावे पेरण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनीच हे कटकारस्थान रचलंय. पोलिसांनी दोन ग्रॅम कोकेन सापडल्याचा दावा केला. पण ७ मिलीग्रॅम कोकेन जास्त भरलं पाहिजे अशी व्यवस्था करत जामीन न मिळण्यासाठी स्थिती निर्माण केली.  न्यायालयात जाण्याआधीच पोलिसांनी एक व्हिडीओ व्हायरल केला. पोलिसांना ही चूक भोवणार आहे असेही असिम सरोदे  पुढे म्हणाले

संबंधित बातम्या