माणिकराव कोकाटे यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता ज्यावेळेस पहिला व्हिडिओ समोर आला त्यावेळेसच राजीनामा होणे आवश्यक होते.यांना सांगावं लागतं की राजीनामा द्या स्वतः राजीनामा देत नाहीत.दिल्लीने मध्यस्ती केल्याशिवाय राजीनामे होत नाहीत महाराष्ट्राला न्याय कधी मिळणार माणिकराव कोकाटे यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता. असे प्रतिपादन सुप्रिया सुळे यांनी केले.
पुरुषांनी फॉर्म कसे भरले ? कोणाकडे कॉन्टॅक्ट आहे त्याची चौकशी करा. निवडणुकीच्या आधी घाईघाईने यांनी जास्ती फॉर्म भरून घेतले. यामागे मोठे षडयंत्र आहे ज्या कंपनीने फॉर्म भरून घेतले त्यांची इन्क्वायरी करा.एस आय टी, ई डी च्या माध्यमातून इन्क्वायरी झाली पाहिजे.१५० दिवसात महाराष्ट्राची मोठी बदनामी झाली आहे.याचा जबाब या सरकारला द्यावे लागेल.ज्ञवाल्मीक कराड जेलमधून फोनवर बोलत आहेत.वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट सुरू आहे असेही सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या