रेव्ह पार्टी केल्याप्रकरणी अटकेत असलेले एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर पोलिसांची कारवाई पारदर्शकरीत्या, नियमानुसार कायदेशीररीत्या होईल. या आधी जी कारवाई झाली आहे, त्याची विस्तृत माहिती यादी प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे. असे प्रतिपादन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेण्याचे कारण नाही. कुठल्याही प्रकाराचे फोटो व्हिडिओ पोलिसांकडून देण्यात आलेले नाहीत लोकांपैकी कोणी फोटो किंवा व्हिडिओ काढत असतील, तर त्यावर बंधन आम्ही घालू शकत नाही.करण्यात आलेली कारवाई ही मिळालेल्या गुप्त माहितीवर आधारीत कारवाईबाबत कुणीही मनात शंका घेऊ नका. कुणीही संशय घेऊ नका, आम्ही कुठल्याही प्रकारचा फोटो लीक केला नाही.असेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले