पुणे :एकनाथ खडसे पत्रकार परिषदेत कोणावर संतापले.?

पुणे :एकनाथ खडसे पत्रकार परिषदेत कोणावर संतापले.?
  • MG News
  • जुलै 29 2025

Share on  

 जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीमध्ये सहभाग असल्याचा कारणावरून  पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर बाजू मांडण्यासाठी एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.या पत्रकार परिषदेत रेव्ह पार्टी प्रकरणात ते मोठे खुलासे करताना दिसले. मात्र यावेळी या पत्रकार परिषदेमध्ये पुणे पोलिस दाखल झाले. सिव्हिल ड्रेसमध्ये पुणे पोलिसांची टीम पत्रकार परिषदेत आली, असे खडसेंनी सांगितले.एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांचे काही फोटो आणि व्हिडीओ दाखवले. माझ्या खासगी मालमत्तेत पोलिसांनी येण्याची गरज काय असे म्हणत त्यांनी याबाबत तीव्र नापसंती दर्शवली.

 एकनाथ खडसे यांनी अगोदरच दावा केला आहे की, पुणे पोलिसांकडून माझ्या जावयावर पाळत ठेवली जात होती. पोलिसांनी काढलेले फोटो आणि व्हिडीओ मिडियापर्यंत लगेचच कसे पोहोचतात. माझ्या स्वत:च्या घराबाहेर आठ ते दहा पोलिस पाळत ठेऊन होते आणि पत्रकार परिषदेमध्ये ते आत येऊन बसले. मला वाटते की, माझ्यावर पाळत ठेवण्याचे काय कारण? आणि हे घरामध्ये येऊन बसले आणि पोलिसांना पत्रकार परिषदेमध्ये येऊन बसण्याचा कोणी अधिकार दिला. असेही यावेळी एकनाथ खडसे म्हणाले

संबंधित बातम्या