3 हजार लोकांची चौकशी, 100 ठिकाणी छापे, दहशतवादी पहलगाममध्ये पोहोचले कसे? 

3 हजार लोकांची चौकशी, 100 ठिकाणी छापे, दहशतवादी पहलगाममध्ये पोहोचले कसे? 
  • MG News
  • मे 3 2025

Share on  


3 हजार लोकांची चौकशी, 100 ठिकाणी छापे, दहशतवादी पहलगाममध्ये पोहोचले कसे? 
लवकरच NIA चा अहवाल येणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयए करत आहे. संपूर्ण टीम श्रीनगरमध्ये कॅम्पिंग करत आहे. तपास यंत्रणेचे महासंचालक आज श्रीनगरहून दिल्लीला परतू शकतात, असे मानले जात आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयए करत आहे. संपूर्ण टीम श्रीनगरमध्ये कॅम्पिंग करत आहे. तपास यंत्रणेचे महासंचालक आज श्रीनगरहून दिल्लीला परतू शकतात, असे मानले जात आहे. त्यानंतर ते आज गृह मंत्रालयाला आपला अहवाल सादर करतील. एनआयएने हल्ल्याशी संबंधित 3000 हून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच महत्वाच्या 100 ठिकाणांवरही छापे टाकले आहेत. त्यामुंळं दहशतवादी नेमके कसे पहलगाममध्ये पोहोचले याची माहिती मिळणार आहे. 

एनआयएचे महासंचालक (डीजी) सदानंद दाते हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक अहवाल गृह मंत्रालयाला सादर करतील. केंद्र सरकार या हल्ल्याबाबत अत्यंत गंभीर आहे आणि तपास यंत्रणांना सर्व पैलूंची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयए पथकाने पीडित कुटुंबांचे जबाबही नोंदवले होते. त्यांच्या भेटीदरम्यान, एनआयएचे महासंचालक यांनी बैसरन व्हॅलीला भेट दिली आहे. घटनास्थळी तपासाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठकही घेतली. या बैठकीत, सध्याच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच, गुप्तचर यंत्रणा मजबूत करण्यावर आणि सामायिक माहितीची चांगली देवाणघेवाण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

संबंधित बातम्या