रायगड : दोन एसटी बसमध्ये भीषण अपघात: 10 प्रवासी जखमी
रायगडच्या महाड तालुक्यातील कुर्ला-महाड रस्त्यावर दोन एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक झाली. फौजी आंबवडे-पुणे मार्गावरील बसने महाड लोकल बसला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात 10 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने महाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात दोन्ही बसांचे मोठे नुकसान झाले आहे. धडकेनंतर काही प्रवासी बसमध्ये अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल असून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे.