रत्नागिरी :  मिरकरवाडा बंदराची  नितेश राणे यांच्याकडून पाहणी

रत्नागिरी :  मिरकरवाडा बंदराची  नितेश राणे यांच्याकडून पाहणी
  • MG News
  • जुलै 27 2025

Share on  

मिरकरवाडा बंदराचा विकास कामांचा टप्पा २ चा रविवारी  शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने मस्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री  नितेश राणे यांनी 
मिरकरवाडा बंदराचा विकास करण्यासाठी सुरु केलेल्या कामांची पाहणी केली. मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटवताना मत्स्य विभाग चर्चेत आला होता.  मिरकरवाडा बंदरासाठी ११३ कोटी रुपयांची सरकारकडून तरतूद करण्यात आली आहे.
यापुर्वी टप्पा १ मधून मिरकरवाडा बंदरासाठी ७४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्यातील कामांसाठी २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे .मिरकरवाडा बंदर विकासकामांमध्ये लाट विरोधी संरक्षक भिंत बांधणे, गाळ काढणे, लिलाव गृह, अंतर्गत रस्ते अशा विविध कामांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या