एआयएमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी संभाजीनगर शहरात सुरु असलेल्या प्रहार पक्षाच्या चक्काजाम आंदोलनाला भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील यांनी सांगितले की, विधानसभेत ज्या मुद्द्यांवर बोलायला कोणी तयार नाही अशी मुद्दे घेऊन बच्चू कडू नेहमी रस्त्यावर उतरतात. शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रात होतात,ही महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.
सरकार फक्त घोषणा करत आहे. पण त्यांना जो फायदा मिळाला हवा तो तिथपर्यंत मिळत नाही. असे ही यावेळी इम्तियाज जलील म्हणाले.