संभाजीनगर :  निशा बाफना कॅपिटल बिल्डिंगमध्ये भीषण आग; जीवितहानी टळली

संभाजीनगर :  निशा बाफना कॅपिटल बिल्डिंगमध्ये भीषण आग; जीवितहानी टळली
  • MG News
  • मे 4 2025

Share on  

संभाजीनगर :  निशा बाफना कॅपिटल बिल्डिंगमध्ये भीषण आग; जीवितहानी टळली

  आकाशवाणी चौकातील 'निशा बाफना कॅपिटल' या इमारतीमध्ये अचानक आग लागली. या इमारतीतील आदित्य बिरला कॅपिटलसह आणखी दोन ते तीन कार्यालये आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. रविवार असल्याने सर्व कार्यालये बंद होती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, कार्यालयातील दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक साहित्य व फर्निचरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून, शटर तोडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे, मात्र इमारतीच्या काही भागात धुराचे लोट व उष्णता जाणवत असल्याने, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसर रिकामा करण्यात आला होता

संबंधित बातम्या