सांगली :  जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या तरुण कंत्राटदाराची नैराश्यातून आत्महत्या

सांगली :  जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या तरुण कंत्राटदाराची नैराश्यातून आत्महत्या
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या  कंत्राटदाराने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना घडली आहे. हर्षल पाटील  असे आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. राज्य सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याच्या नैराश्यातून हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याचा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने आरोप केलाय.वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी हे हर्षल पाटील यांचे गाव आहे. बुधवारी रात्री हर्षल यांनी शेतात जाऊन गळफास घेतल्याचं समोर आलं. हर्षल यांची शासनाकडे जवळपास १कोटी ४० लाख रूपयांची देयके प्रलंबित होती तसेच सावकार व इतर आर्थिक लोकांकडून त्यांनी जवळपास ६५ लाखांचे कर्ज घेतले होते.

  गेल्या अनेक दिवसांपासून हर्षल त्यांच्या मित्रांना मी आत्महत्या करतो हे शासन पैसे देत नाही इतर लोक मला पैशासाठी तगादा लावत आहेत वडिलांना काय सांगू‌ नका असे बोलत असे. हर्षल यांच्या पाठीमागे  पत्नी, एक पाच वर्षांची मुलगी, दोन लहान भाऊ आणि आई वडील असा परिवार‌ आहे . त्यांच्या परीवारास शासनाने तातडीने आर्थिक मदत  प्रलंबित देयके देऊन  सदर त्यांच्या नावे असलेले कंत्राटदार म्हणून असलेले शासकीय नोंदणीकरण त्यांच्या सुविद्या पत्नीच्या नावे वर्ग करावेच लागेल, शासनाने कंत्राटदारांची सर्व विभागाकडील देयके तातडीने देण्याची व्यवस्था करावी अन्यथा आपण असे नवयुवक,उद्योजक, कंत्राटदार आपले जीवन संपवून टाकतील व आपले कुटुंब नाहक आर्थिक अडचणीत येतील याची शासनास फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणीपुरवठा संघटना राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले, महासचिव सुनील नागराळे व सर्व पदाधिकारी यांनी शासनास इशारा दिला आहे. 

 

 

 

 

 

 


 
 

संबंधित बातम्या