: शालेय पोषण आहार कामगारांचा 7 मार्च रोजी आझाद मैदान येथे एल्गार

: शालेय पोषण आहार कामगारांचा 7 मार्च रोजी आझाद मैदान येथे एल्गार
  • MG News
  • मार्च 9 2025

Share on  

 

5 जुलै 2024 रोजी 1 हजार रुपयाची वाढ झालेली आहे . त्या शासन निर्णय याची आमलंबजावणी करा . इत्यादीसह अनेक प्रलंबीत मागण्यासाठी दिनांक 7 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशनचे राज्य अध्यक्ष कॉ प्रा ए बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शालेय पोषण आहार कामगारांचा मोर्चा काढण्यात आला आहे . असे दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात फेडरेशनचे राज्य सरचिटणीस  डॉ अशोक थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे .
         या बाबत सविस्तर असे की , राज्यातील 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणाऱ्या शालेय पोषण आहार कामगारांमध्ये विधवा , परितकत्या , घटस्फोटीत , दलित ओबीसी व गरीब घरातील गरजू पुरुष महिला काम करतात . त्यांना अनेक प्रकारची सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अनेक प्रकारची कामे करावे लागतात . त्यांचा या कामांमध्ये 6 तास वेळ जातो आणि या मोबदल्यात त्यांना देशात इतके कमी मानधन कुठेच नाही असे 83 रुपये रोज या प्रमाणे 2500 रुपये महिना मानधन दिले जाते . आणि ते पण वेळेवर मिळत नाही . 5 जुलै 2024 रोजी राज्य शासनाने कॅबीनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधनामध्ये 1 हजार रुपयाची वाढ करून शासन निर्णय जाहीर केलेला आहे . पण त्याची अंमलबजावणी केली नाही . शालेय पोषण आहार कामगारांना 10 महिने ऐवजी 12 महिने मानधन द्या , शालेय पोषण आहार कामगारांना केरळ राज्य प्रमाणे 18000 रुपये मानधन द्या , भाऊबीज म्हणून दिवाळीच्या सणाला बोनस द्या , शालेय पोषण आहार कामगारांना शासकीय सेवेत कायम करा , शालेय पोषण आहार कामगारांना वर्षातून दोन युनीफॉर्म द्या . 5 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयाचे प्रभावीपणे अंमलबजावणी करा . इत्यादी सह अनेक मागण्यासाठी आझाद मैदान येथे महाराष्ट्रातु हजारो महिलांनी मोर्चा मध्ये सहभाग नोंदवला होता . या वेळी शासनाच्या विरोधात घोषणा देऊन आझाद मैदान घोषणांनी दनानुन सोडले होते . यावेळी पाच जणांचे शिष्टमंडळ शालेय शिक्षण मंत्री मा ना श्री  दादासाहेब भुसे यांना भेटून सविस्तर चर्चा करण्यात आली . 1 हजार रुपयांच्या वाढीसाठी या अधिवेशनामध्ये निर्णय घेऊन , त्याची अंमलबजावणी केली जाईल . अशा अनेक मागण्या बाबत  सकारात्मक घेतल्या जातील असे शालेय शिक्षणमंत्री यांनी आश्वासन दिले .यावेळी मोर्चाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने  वतीने सचिव मंडळ सदस्य कॉ शैलेंद्र कांबळे कॉ एस के रेगे , सीटू चे राज्य कोषाध्यक्ष कॉ के आर रघु , अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या राज्याच्या नेत्या व सीटूच्या पदाधिकारी कॉ आर माय टी इरानी , तलासरी पंचायत समितीच्या सभापती कॉ सुनीता शिंगाड , कॉ ए बी पाटील , कॉ डॉ अशोक थोरात , कॉ मिरा शिंदे , कॉ अनिल मिसाळ , कॉ भैया देशकर कॉ शरद पाटील यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले . या वेळी यांच्या सह फेडरेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते तसेच हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी   महादेव गारपवार ,लता खेपकर , नंदा बांगर , हेमलता शेळके , रामचंद्र बरफ , वैशाली मुंजेवार , संगीता चौधरी , गणेश जाधव , संतोष शिर्के , कुसुमताई देशमुख , दिलीप पोपळे , सुरेश धायगुडे इत्यादी सह अनेक जिल्ह्याच्या व तालुक्याच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा यशस्वी केला . असे दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात महाराष्ट्र शालेय  पोषण आहार कामगार संघटना फेडरेशनचे राज्य सरचिटणीस कॉ डॉ अशोक थोरात यांनी माहिती दिली .
 संतोष बोरुडे अहिल्यानगर

संबंधित बातम्या