शिंदे शाहांना भेटतात, उद्या आमच्या दारातही येतील 

शिंदे शाहांना भेटतात, उद्या आमच्या दारातही येतील 
  • MG News
  • एप्रिल 19 2025

Share on  

 

- ते सुद्धा ठाकरे आहेत आणि हे सुद्धा ठाकरे आहेत 
- दोघे भाऊ आहेत
- नातं कायम आहे 
- उद्धव ठाकरे यांचा मार्ग कायम महाराष्ट्र हिताचा राहिला आहे
- मी सुद्धा त्यांचं वक्तव्य ऐकलं आहे
- महाराष्ट्र हितासाठी वाद मिटवायला तयार आहे
- यावर उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले की, असलं तर मिटवायला वेळ लागणार नाही 
- फक्त भूमिका एवढीच आहे की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की महाराष्ट्राच्या मुळावर येणारा जो आहे त्याच्यासोबत जाऊ नये
- आमची 25 वर्षांची युती होते 
- काही काळ राज ठाकरे सुद्धा शिवसेनेत होते 
- लोकसभा, विधानसभेच्या वेळेला आमची भूमिका होती की महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका कोणी घेऊ नये
- महाराष्ट्रातून अनेक उद्योगधंदे बाहेर जातात, ही सुद्धा भूमिका आहे 
- तेव्हा अशा शक्तींसोबत राहणं योग्य नाही 
- ती भूमिका आमची आज सुद्धा आहे 
- आज सुद्धा उद्धव ठाकरेंनी अत्यंत नम्रपणे सांगितलं 
- आज सुद्धा अशा काही शक्ती आहेत, त्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात
- महाराष्ट्राचं नुकसान व्हावं, महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान व्हावं, अशा लोकांच्या पंगतीला मी बसणार नाही. अशा माणसांना घरात सुद्धा घेणार नाही, अशी भूमिका घेणं गरजेचं आहे 
- छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू, महाराष्ट्राचे शत्रू, ही भूमिका जर कोणी घेत असेल तर स्वागत आहे 
- त्यानंतर आम्ही या चर्चेला सुरुवात करू
- सध्या महाराष्ट्राची गंभीर परिस्थिती आहे 
- आम्ही आमच्या घरामध्ये किंवा दरामध्ये महाराष्ट्र दोषींना कधीही थारा देणार नाही
- अशी भूमिका राज ठाकरे किंवा त्यांच्या माणसाने करणं गरजेचं आहे
- महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्तित्व मिटवण्याच्या मागे ते आहेत. त्यांना ठाकरे हे नावच मिटवायचं आहे 
- दोन्ही ठाकरेंनी साद आणि प्रतिसाद अशी भूमिका घेतली असेल तर स्वागत आहे 
- उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडल्यावर आम्ही प्रतीक्षा करू काय होतं 
- वेट अँड वॉच आहे, पण आम्ही सकारात्मक भूमिकेतून जात आहोत 
- संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळेला अनेकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला होता

महाविकास आघाडी 
- यावर मी आता उत्तर देणार नाही
- राज ठाकरे यांचा वापर करून हे मराठी माणसाला त्रासण्याचे काम करतात, हे राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल
- माझी आत्ताच उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली 
- आज सकाळी चर्चा झाली आणि काल रात्री सुद्धा चर्चा झाली 
- आम्ही हवेत बोलत नाही 
- ही मुंबई, हा महाराष्ट्र याच्यावर जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावचं लागेल 
- यापेक्षा अजून चांगलं घडण्याची आम्ही वाट पाहत आहोत 
- महाराष्ट्राच्या हितासाठी जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला नाकारण्याचं कारण ते पण आमच्यापासून होणार नाही 
- बाळासाहेबांसोबत जो प्रवास झाला आहे तो आम्ही विसरू शकत नाही
- उद्धव ठाकरे सुद्धा विसरू शकत नाहीत
- महायुतीची ताकद नाही 
- महायुतीची ताकद काय आहे हे समजून घ्यायला तुम्हाला वॉशिंग्टनला जावं लागेल 
- ईव्हीएमच्या माध्यमातून घोटाळे करून निवडणूक जिंकल्या जातात 
- दोन भाऊ एकत्र आले अशी तर लोकभावना आहे 

 एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे भेट 
- भेटीगाठी तर होत असतात  
- एकनाथ शिंदे सुद्धा त्यांचे पक्षप्रमुख अमित शाह यांना भेटतात 
- काँग्रेस सोबत आमचे वैचारिक संबंध वेगळे असले तरीसुद्धा योगदान विसरता कामा नये
- शिंदे शाहांना भेटतात, उद्या आमच्या दारातही येतील

- राज ठाकरेंनी मनमोकळ केलं आहे 
- त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा बोलले आहेत 
- थोडं थांबा आपण वाट पाहू 

संदीप देशपांडे 
- आम्ही सकारात्मक आहोत
- बाकी कोण काय बोलतोय माहित नाही 
 

संबंधित बातम्या